img


Subscribe on:

Latest Podcast

podcast1
अभी तो यह झांकी है,आगे और भी बाकी है। पडद्याआडून अनेक नेत्यांचा होणार राजकीय गेम ...

कॅप्टन फाईल्स, म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. कॅप्टन अशोक खरात फाइल्स समाज माध्यमावर आता वेगाने व्हायरल होत आहेत. हे प्रकरण केवळ भोंदूबाबा भोवती फिरत नसून खरातच्या निमित्याने पडद्याआडून अनेक राजकीय नेत्यांचा गेम करण्याचे कारस्थान सुरू आहे. #sakalaam #kolhapur #breakingnews #ashokkharat #rupalichakankar #devendrafadnavis #eknathshinde #rajthackeray #suniltatkare

podcast1
मतदार संघ पुनर्रचना झाल्यास; कोल्हापूरचे खासदार आणि आमदार किती होणार ?

लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने राजकीय मंथन सुरू केले आहे. 2011 च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभा व विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना केल्यास, त्यामध्ये 50% पर्यंत वाढ करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र असे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढण्याची शक्यता आहे. #sakalaam #kolhapur #kmc #mahanagarpalika #nivadnuk #election #electioncommission #population

ताज्या घडामोडी

इराण- इस्राइल अमेरिका युद्धाचा २८वा दिवस; युद्धाच्या आघाडीवर काही महत्वाच्या बातम्या

28-03-2026

मध्यपूर्वेतील युद्धाने आता भीषण वळण घेतले. इराण समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच थेट इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले आहे. यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने (IDF) दक्षिण लेबनॉनमध्ये आजही जोरदार हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणमधील नागरिक गेल्या चार आठवड्यांपासून पूर्णपणे इंटरनेट बंद आहे, ज्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमेरिकेने आपली ८० हून अधिक विमाने वाहून नेणारी महाकाय युद्धनौका 'USS जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश' मध्यपूर्वेकडे रवाना केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी "आम्ही इराणला चिरडत आहोत" असा दावा केला तर नाटो (NATO) देशांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान आता सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त या देशांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करणार आहे. हुथींनी थेट इस्रायलला लक्ष्य केल्यामुळे लाल समुद्रातील (Red Sea) जहाजांची वाहतूक पुन्हा धोक्यात आली आहे. यामुळे युद्ध अजून चिघळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नव्याने चर्चा...

28-03-2026

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण होत असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (AP आणि SP) विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या प्रक्रियेसाठी 'सुनेत्रा पवारांशी' (Sunetra Pawar) चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विलीनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, परंतु त्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चेच्या टेबलावर येण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून पक्षातील समीकरणे बदलली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबियांना एकत्र आणण्याचे प्रयत्न 'पार्थ पवार' यांनी केले होते, मात्र त्याला यश आले नाही, अशी खंतही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. रोहित पवारांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे दोन्ही पक्षांतील दरी रुंदावली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये अजूनही एकीची भावना कायम आहे. राष्ट्रवादीतील विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, फक्त सुनेत्रा ताईंशी बोलायला हवं अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आल आहे.

मोदी-ट्रम्प यांच्यातील 'इराण युद्ध' चर्चेत इलॉन मस्कचा सहभाग नव्हता, परराष्ट्र मंत्रालयाचा खुला

28-03-2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २४ मार्च रोजी झालेल्या टेलिफोनिक चर्चेने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या उच्चस्तरीय चर्चेत अब्जाधीश इलॉन मस्कनेही (Elon Musk) सहभाग घेतला होता. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी हे दावे फेटाळून लावत ही चर्चा केवळ दोन राष्ट्रप्रमुखांमध्येच झाल्याचे स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत खुलासा करताना म्हटले कि, आम्ही ते वृत्त पाहिले आहे, परंतु ही चर्चा केवळ मोदी आणि ट्रम्प यांच्यातच झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील बिघडत्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मधील वाहतूक सुरक्षित आणि अखंड ठेवण्यावर उभय पक्षांनी भर दिला. ही चर्चा फक्त दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये झाली, यात तिसरी कोणतेही व्यक्ती नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद....

28-03-2026

महावितरण तर्फे 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी 30 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार, 30 मार्च रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी 31 मार्च 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे.

त्यामुळं नागरीकानी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे अस आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मार्च एंडिंगची शासकीय कार्यालयात लगबग....

28-03-2026

शासकीय कार्यालय, बँका, मुद्रांक कार्यालयात मार्च एंडिंगची लगीनघाई सुरू आहे. आज, शुक्रवार, आणि सोमवारी दोनच दिवस अधिकृतपणे कार्यालये सुरू असतील. कारण शनिवार, रविवार आणि मंगळवारी शासकीय सुट्टया आहेत. त्यामुळे शासकीय वसुली, खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कार्यालयात ठाण मांडून बसावे लागणार आहे. अनेक कर्मचारी गुरुवारी रामनवमीची सुट्टी असतानाही कार्यालयात उपस्थित राहून निधीचा ताळमेळ घालताना दिसत होते. लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
१ एप्रिल ते ३१ मार्च शासकीय खर्चाचे आर्थिक वर्ष आहे. महसूल विभाग, ग्रामपंचायत, महापालिका तसच इतर शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसुली केली जात आहे. यामध्ये शासनाचे सर्वच विभाग आघाडीवर असतात. मालमत्ता कर पाणी बिल, विज बिल तसंच इतर करांच्या वसुलीसाठी मोहिमा राबवल्या जातात. थकीत बिल भरावे अन्यथा कारवाई केली जाईल अस आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद महानगरपालिका अर्थ विभागात विविध विकास कामासाठी मंजूर झालेला निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.


अजून पहा
img
कामात आहात? प्रवासात आहात?

आमचे पॉडकास्ट ऑडिओ स्वरुपात ऐका...

आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका

आमचे नवीन पॉडकास्टस पाहा

आमचे सर्व पॉडकास्टस

असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं पॉडकास्ट!

एक अशी संवादमालिका जिथं पुस्तक फक्त वाचलं जात नाही तर ते अनुभवलं जात! या पॉडकास्टमध्ये आम्ही भेटणार आहोत त्या लेखकांना, अनुवादकांना, संपादित करणाऱ्यांना ज्यांची शब्दांनी विचारांना नवी दिशा दिली.

जगभरात घडणाऱ्या. लक्ष वेधून घेणाऱ्या परिणामकारक घटनांचा वेध दर आठवड्याला श्रीराम पवार यांच्या नजरेतून पाहायला विसरु नका

Enjoy New Shows

Latest episodes

img
List of Episodes

Listen Our Podcosts On Go!

Our Testimonals

Reviews from users

imng
imng
imng
img

अतुलनीय संवाद आणि प्रेरणादायक विचार! ह्या पॉडकास्ट ने मला नवीन विचार देणारे आणि जीवनावर नवा दृष्टिकोन आणले.

पर्णा देशमुख
img
img

खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. हे पॉडकास्ट नेहमीच वेगळ्या दृषटिकोनातून विचार मांडतात.

रोहन पटेल
img
img

माझ्या दैनंदिन आयुष्यात नवा उत्साह भरला आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी खूप शिकले.

दीक्षा शर्मा
img
img
img img
David Michale Episode 13
Previous track button
Large toggle button
Next track button
00:00 / 00:00